आदित्य ठाकरेंचे डोळे दिसले तर डोळ्यात डोळे घालता येतील ना ? बंडखोर आमदार संजय गायकवाड यांचा टोला

बुलडाणा : बंडखोर आमदार हे डोळ्यात- डोळे घालून बोलू शकणार नाहीत असे विधान आ. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आमदारांच्या भूमिकेनंतर केले होते. मात्र, या वक्तव्याची आता आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी खिल्ली उडवली आहे.

आदित्य ठाकरे यांच्या त्या विधानाबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की, त्यांचे डोळे दिसले तर डोळ्यात डोळे घालता येतील ना ? असं म्हणत गायकवाड यांनी खिल्ली उडवली आहे. संजय राऊत यांचा समाचार घेताना पुढे ते म्हणाले, शिवसेनेतील बंड पाहून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यातील आमदारांवर खालच्या पातळीवर टिका केली. काहींचे बाप काढले तसे आम्हीही त्यांचे बाप काढू शकतो.

आम्ही 42 आमदारांनी संजय राऊत यांना मतदान केलं, त्यामुळे त्यांनी सांगाव आता हे 42 आमदार त्यांचे बाप आहेत का ? त्यांनी आधी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर बोलावं. शिवाय संजय राऊत हे राष्ट्रवादीची (NCP) सुपारी घेऊन शिवसेना (Shivsena) संपवायला निघाले होते, असाही आरोप संजय गायकवाड यांनी केला.