Arun Bali Passes Away: ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली काळाच्या पडद्याआड, 79व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Mumbai – शुक्रवारी सकाळी बॉलिवूडमधून आणखी एक वाईट बातमी आली. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अरुण बाली यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, अरुण बाली यांनी पहाटे साडेचार वाजता अखेरचा श्वास घेतला. अनेक सेलिब्रिटी आणि चाहते सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत आणि चाहते त्याच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करत आहेत. अरुण बाली यांच्या निधनाने टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

अरुण बाली यांचा जन्म २३ डिसेंबर १९४२ ला लाहोरमध्ये झाला. अनेक दिग्गज कलाकारांसोबतही त्यांनी काम केले होते. अरुण बाली हे बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला मायस्थेनिया ग्रॅव्हिस या दुर्मिळ आजाराने ग्रासले होते.(arun bali passes away ).