आता जीएसटीमध्ये घोळ करणाऱ्यांवर ईडी कारवाई करणार

GST : आता सरकारने वस्तू आणि सेवा कर नेटवर्क (GSTN) PMLA अंतर्गत आणण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याचा अर्थ आता ईडी जीएसटीशी संबंधित प्रकरणांमध्ये थेट हस्तक्षेप करू शकणार आहे. ईडी जीएसटी चुकवणाऱ्या फर्म, व्यापारी किंवा संस्था यांच्यावर थेट कारवाई करू शकेल.

अप्रत्यक्ष कर आणि कस्टम करचोरी रोखण्यासाठी सरकारने आणखी एक पाऊल उचलले आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जीएसटी नेटवर्कच्या डेटाची संपूर्ण माहिती ईडीला दिली जाईल. अधिसूचना PMLA च्या कलम 66(1)(iii) अंतर्गत ED आणि GSTN मधील माहितीची देवाणघेवाण करण्यासंबंधी आहे.

पीएमएलएला टेरर फंडिंग आणि ड्रग्ज तस्करीला सामोरे जाण्यासाठी आणण्यात आले होते. मनीकंट्रोलनुसार, जीएसटीएन अंतर्गत बरीच संवेदनशील माहिती आहे, जी तपासात मदत करू शकते. तपासात ईटीकडून अधिक मदत मिळू शकेल, असे या तज्ज्ञाने सांगितले. अधिसूचना आता GSTN आणि ED या दोघांमध्ये माहिती किंवा इतर गोष्टींची देवाणघेवाण सुलभ करेल.