Punyeshwer Mahadev : नितेश राणे-महेश लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मुस्लिम संघटनांची मागणी

Punyeshwer Mahadev : भाजपचे आमदार नितेश राणे आणि महेश लांडगे (BJP MLAs Nitesh Rane and Mahesh Landge)nयांनी पुण्यातील पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील दर्ग्याबाबात केलेल्या वक्तव्यांना मुस्लिम संघटनांनी आक्षेप घेतलाय. ज्या दर्ग्याबाबात हा वाद सुरु आहे त्या दर्ग्याचे विश्वस्त आणि मुस्लिम संघटनांनी आज पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेतली आणि भाजपच्या आमदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

त्याचबरोबर समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी पोलीसांना दिलेल्या निवेदनात करण्यात आलीय. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा मुस्लिम संघटनांनी दिलाय. पुण्यातील कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील दर्ग्यातील बांधकाम पाडण्याची मागणी भाजपच्या आमदारांकडून आदोलनादरम्यान करण्यात आली होती. त्यानंतर मुस्लिम संघटनांनी पोलीस आयुक्तांची भेट घेण्यात आली.

महत्वाच्या बातम्या –