सुरेश रैनाला बोली न लागल्याने सीएसकेचे ‘ते’ ट्विट चर्चेत…

नवी दिल्ली : टाटा आयपीएल २०२२ साठी यावर्षी तब्बल २०७ खेळांडूवर बोली लागली. यापैकी ६७ परदेशी खेळाडू होते. तर दुसरीकडे या लिलावात अनेक दिग्गज खेळाडूंवर बोली लागली नाही. त्यामुळे अनेक चाहत्यांना याचा धक्का बसला आहे. लिलाव न झालेल्या खेळाडूंपैकी २२ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी कामगिरी बजावली आहे. ज्यामध्ये सुरेश रैना, शाकिब अल हसन आणि इयान मॉर्गनसारख्या खेळाडूंचा सामावेश आहे.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट प्रकारात २ नंबरवर असलेल्या तबरेस शम्सीला देखील यावेळी बोली लागली नाही. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर असलेला आदिल रशीद, अँडम झाम्पां यांना देखील कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. आयसीसी टी-२० नंबर दुसऱ्या क्रमांकावर असलेला अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनलाही संघात घेण्यास कोणीही रस दाखवला नाही.

याशिवाय टी-20 इंटरनॅशनलमधील नंबर 2 गोलंदाज तबरेस शम्सी यालाही यावेळच्या लिलावात विकत घेतले गेले नाही. आदिल रशीद (क्रमांक 3) आणि अॅडम झाम्पा (क्रमांक 4) आणि क्रमांक दोनचा ICC T20I अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन हे दिग्गजांपैकी एक होते ज्यांना कोणत्याही फ्रेंचायझीने खरेदी करण्यात रस दाखवला नाही. त्याचबरोबर इयॉन मॉर्गन, फिंचसारखे खेळाडूही विकले गेले नाहीत.

चेन्नई सुपर किंग्जनेही मिस्टर आयपीएल म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरेश रैनालाही संघात स्थान दिले नाही. त्यामुळे चाहते फार नाराज झालेत. याबद्दल चेन्नई सुपर किंग्जने सुरेश रैनाला बोली न लागल्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात सुरेश रैनाचं आभार मानले आहे. चेन्नई सुपर किंग्जने ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘चिन्ना थाला, आम्हा सर्वांना दिलेल्या पिवळ्या आठवणीबद्दल धन्यवाद’ आयपीएलच्या इतिहासात रैनाने 205 सामन्यांमध्ये 39 अर्धशतके आणि एका शतकासह 5528 धावा केल्या आहेत. रैनाने 203 षटकारही मारले असून त्याच्या नावावर 25 विकेटही आहेत.