Ashish Shelar | वांद्रे पश्चिम येथे उभे राहणार १६५ खाटांचे कॅन्सर रुग्णालय; आशिष शेलार यांच्या प्रयत्नांना यश

Ashish Shelar – मुंबई शहरात परवडणारे किंवा मोफत कर्करोग उपचार (Cancer treatment) शोधणाऱ्या हजारो रुग्णांना दिलासा देण्यासाठी मुंबई महापालिका (Mumbai Municipality) लवकरच वांद्रे (पश्चिम) (Bandra West) येथे 165 खाटांचे स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभारणार आहे. कॅन्सर रुग्णांची संध्या वाढत असून सध्या मुंबईत कॅन्सर सेवेचा मुख्य भार परळ आणि खारघर येथील टाटा मेमोरियल सेंटर्सद्वारे उचलला जातो. मुंबई सेंट्रल जवळील नायर रुग्णालय हे रेडिएशन थेरपी देणारे एकमेव नागरी केंद्र आहे.

त्यामुळे वांद्रे येथील भाभा रुग्णालयासमोर असणाऱ्या महापालिकेच्या भूखंडावर स्वतत्र कॅन्सर हॉस्पिटल असावे अशी कल्पना स्थानिक आमदार व मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबई महालिकेकडे मांडली होती. पालिकेने ही मागणी मान्य केली असून याबाबत दोन बैठकाही आयुक्त इक्बाल चहल यांच्यासोबत झाल्या. त्यानुसार वांद्रे कर्करोग रुग्णालयाचा प्राथमिक आराखडा पालिकेने तयार केला आहे.

केमोथेरपीपासून ब्रॅकीथेरपी आणि रेडिएशनपर्यंत, अतिदक्षता विभागासह संपूर्ण कर्करोगाची काळजी घेणारे हे अद्यावत रुग्णालया असेल. पालिकेच्या वास्तुविशारद शाखेने तयार केलेला प्राथमिक आराखडा पालिकेच्या इमारत देखभाल विभागाच्या आरोग्य पायाभूत सुविधा कक्षाकडे सादर करण्यात आला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

भाभा हॉ‍स्पिटल समोरिल जमीन 2,525-चौरस-मीटरचा भूखंड सध्या नगरपालिका सुविधांसाठी राखीव आहे त्यावर हे ग्राऊंड प्लस-नऊ-मजली इमारतीचे रूग्णालया प्रस्तावित करण्यात आले आहे. ज्यामध्ये सुमारे 12,000 स्क्वेअर मीटरच्या बिल्ट-अप क्षेत्रासह दोन तळघर असतील. रेडिएशन थेरपीसाठी दोन बंकर खोल्या असलेल्या या इमारतीत 12 ओपीडी वॉर्ड, बायोकेमिस्ट्री, हिस्टोपॅथॉलॉजी, हेमॅटोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी यासह पाच प्रयोगशाळा असतील. डायग्नोस्टिक मध्ये, मॅमोग्राफी आणि पीईटी-सीटी युनिट्स देखील असतील. रुग्णालयाच्या इमारतीत लेक्चर हॉल, सेमिनार हॉल, रक्तपेढी आणि आयसोलेशन देखील असेल या सोबत आम्ही रूग्णांच्या नातेवाईकांसाठी वसतिगृहासारखी सुविधा निर्माण करण्याचा विचार करत आहोत कारण टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांना किती त्रास होतो हे मी पाहिले आहे., असे अमदार ॲड आशिष शेलार यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

Pune Loksabha Election | खासदार म्हणून पुणेकरांची पसंती कोणाला? माध्यमांच्या सर्व्हेत ‘हे’ नाव आघाडीवर

‘कोणत्या मायमाउलीकडून तू कंबरेपर्यंत पाय दाबून घेतले, माझ्याकडे पुरावे’, अजय बारसकर यांचे जरांगेंवर पुन्हा गंभीर आरोप

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना ‘नारळ’? चौथ्या टप्प्यात बदली होणार असल्याची चर्चा