Udayanraje Bhosale | प्रतापगड संवर्धनाची जबाबदारी छत्रपती उदयनराजे भोसले यांना देणार

सातारा :- प्रतापगड (Pratapgad) संवर्धनाची जबाबदारी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना देण्याचा शासन विचार करत असून प्रतापगड संवर्धनाचे मोठे काम उदयनराजे यांच्याहातून घडावे अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केली. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त आज मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या साताऱ्यातील जलमंदिर पॅलेसमध्ये (Jalmandir Palace) येऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली, तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी 381 कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. यात महाबळेश्वर येथील मंदिर परिसर विकास, प्रतापगड जतन संवर्धन आणि महाबळेश्वर परिसरातील तापोळा, बामनोली येथील पर्यटन क्षेत्राचा विकासकामांचा समावेश आहे.

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या जलमंदिर पॅलेस येथे जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी स्नेहभोजन घेऊन एकमेकांशी संवाद साधला. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना शाल पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली मूर्ती भेट म्हणून दिली. तसेच उदयनराजे यांनीही मुख्यमंत्र्यांना सन्मानित केले. तसेच खासदार असे लिहिलेला केक या दोघांनी मिळून कापला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी खासदार उदयनराजे यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. उदयनराजे भोसले हे सर्वसामान्य जनतेचे राजे असून लोकांमध्ये मिसळून ते सगळ्यांना भेटत असतात त्यामुळेच लोकांना कायमच ते आपलेसे वाटतात. आपल्या राजकीय कारकिर्दीत 3 वेळा लोकसभा आणि एकवेळा राज्यसभेवर निवडून जाण्याची संधी त्याना मिळाली आहे. आधी महसूल राज्यमंत्री म्हणून अंतर कृष्णा खोरे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सिंचन वाढावे यासाठी भरीव काम केले आहे. तसेच आपल्या मतदारसंघातील विकासकामांच्या बाबतीत ते कायमच आग्रही असतात. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी हे जनसेवेचे काम अविरत सुरू ठेवावे या शुभेच्छा शिंदे यांनी दिल्या.

मराठा समाजाने आरक्षणासाठी दिलेल्या लढ्यात ते कायमच अग्रणी होते. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ मी घेतली होती. त्यानुसार राज्यात मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयानंतर उदयनराजे यांच्याशी आज माझी भेट होत आहे हा एक वेगळा योगायोग जुळून आला आहे. तसेच काही जण हे आरक्षण कोर्टात टिकेल अथवा नाही याबद्दल चर्चा करत असले तरीही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात निदर्शनास आणून दिलेल्या त्रुटी दूर करूनच मराठा समाजाला आरक्षण दिल्याने ते कोर्टात नक्की टिकेल असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

सातारा जिल्ह्यातील गडकोट किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन व्हावे अशी खासदार उदयनराजे यांची देखील कायम भूमिका असते. त्याच भावनेतून प्रतापगडाचे पुरातन वैशिष्ट्य जपून जतन आणि संवर्धन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्या कामासाठी उदयनराजे यांनीही पुढाकार घ्यावा असे अवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना केले.

महत्वाच्या बातम्या-

Pune Loksabha Election | खासदार म्हणून पुणेकरांची पसंती कोणाला? माध्यमांच्या सर्व्हेत ‘हे’ नाव आघाडीवर

‘कोणत्या मायमाउलीकडून तू कंबरेपर्यंत पाय दाबून घेतले, माझ्याकडे पुरावे’, अजय बारसकर यांचे जरांगेंवर पुन्हा गंभीर आरोप

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना ‘नारळ’? चौथ्या टप्प्यात बदली होणार असल्याची चर्चा