Ashish Shelar | जरांगेंच्या आंदोलनाला साहित्य कोणी पुरवलं त्यांच्या चौकशीची शेलारांची मागणी

Ashish Shelar – ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आक्रमक पवित्रा घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडवट टीका केली. जरांगेंच्या फडणवीसांवरील टीकेनंतर सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप करताना अतिशय खालच्या पातळीवरील भाषा वापरली होती.

हि टीका करताना देवेंद्र फडणवीस यांच्या जातीचा उल्लेख केल्याने तसेच राजकीय स्वरूपाचे आरोप केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जरांगे यांनी फडणवीस यांना शिवीगाळ देखील केल्याने उलटसुलट चर्चा देखील सुरु झाल्या आहेत. यातच आता मनोेज जरांगेंच्या आंदोलनावरुन सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

जरांगेंच्या आंदोलनाला साहित्य कोणी पुरवलं याची चौकशी करा अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली., तर जरांगेंवर आरोप करणारे कुठून आले याची चौकशी करा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केलीय. यामुळे आगामी काळात हा संघर्ष आणखी चिघळणार असल्याचे दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Maharashtra Politics | ‘गेली शिवशाही, आली गुंडशाही’ , विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा जोरदार निषेध

जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही, दोषी असेन तर राजकारणातून संन्यास घेईन : Rajesh Tope

Interim Budget | राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी आवश्यक ध्येयधोरणांची अर्थसंकल्पातून अंमलबजावणी