अजित पवारांचा मुलगा किरीट सोमय्यांच्या रडारवर, म्हणाले…

मुंबई : मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या कार्यालयात जाऊन फाईल्स पाहिल्यामुळे वादात सापडलेले भाजप नेते किरीट सोमय्या आता ठाकरे सरकारवर आणखी एक बॉम्ब टाकण्याची शक्यता आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा मुलगा जय पवार किरीट सोमय्या यांच्या रडारवर असल्याचे समजते. जय पवार यांचे कारनामे मी लवकरच उघड करणार असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला.

किरीट सोमय्यांनी धमक्या देणं , मुजोरी , दादागिरी सहन करणार नाही, असं म्हटलंय, मुख्यमंत्र्यांमध्ये कारवाईची हिम्मत नाही, मी चॅलेंज करतो मला हात लावून दाखवा, असंही ते म्हणाले आहेत.

अजित पवार यांची 1 हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त झालीय. आता अजित पवारांचा  मुलगा जय अजित पवार जेलमध्ये जाणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.  उद्या रायगड कर्जतला जाणार नंतरच्या काळात पेशव्यांची, वैजनाथ इथली हिंदू देवस्थानची जमीन सलीम बिलाखियाच्या नावाने कशी गेली याची चौकशी करणार असल्याचं सोमय्या म्हणाले.