Chandrasekhar Bawankule – सर्वच घटकांना न्याय देणारा कल्पक, लोकाभिमुख अर्थसंकल्प

Chandrasekhar Bawankule – महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन करण्याचे ध्येय राज्यातील महायुती सरकारने निश्चित केले असून, मायबाप शेतकऱ्यांच्या विकासासाठी  बजेटमध्ये मोठा भाग ठेवण्यात आला. राज्याच्या विकासाची बीजे मजबूत करणारा तसेच समाजातील सर्वच घटकांना न्याय देणारा कल्पक आणि लोकाभिमुख असा अंतरिम अर्थसंकल्प आहे, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी व्यक्त केले.

अर्थसंकल्पातून संशोधन, आरोग्य, कृषी, आदिवासी यांच्या विकासावर भर दिला आहे. यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अर्थ मंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन करतो. महायुती सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात मांडला. त्यावर बावनकुळे यांनी एक्स समाजमाध्यमावरून प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, अर्थसंकल्पात सिंचन, जलयुक्त शिवार योजनेतून हिरवीगार शेती, ३६ हजार  नवे रोजगार, लघु उद्योगाला प्रोत्साहन, तीर्थक्षेत्र विकास, भरीव ऊर्जा निर्मिती, बेळगाव येथे मराठी भाषा उपकेंद्र, शिवजन्मभूमी जुन्नर मध्ये शिवसंग्रहालय, अयोध्या तसेच जम्मू काश्मीर येथे महाराष्ट्र भवन, बारा बुलतेदारांसाठी संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळ, सारथी, बार्टी, महाज्योतीच्या शिष्यवृत्ती योजनांत एकसंघता, बार्टी प्रमाणेच अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था, औंध येथे एम्स, उसतोड कामगरांना वीमा, दिव्यांग विकासासाठी योजना, ड्रोन मिशन, स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्तवेतनात दुप्पट वाढ, पोलिसांसाठी योजना, सर्वच तालुक्यात डायलीसिस केंद्रे, महिलांसाठी पिंक रिक्षा, नागपूरच्या विभागीय क्रीडा संकुलाला राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा, राज्यात पायाभूत सुविधा, निर्यातवाढीसाठी ५ इंडस्ट्रियल पार्क, मिहानला निधी, विमातळाचे विस्ताऱीकरण आणि रेल्वेचे जाळे मजबूत करण्याचा संकल्प सरकारने सोडला असून, यामुळे महाराष्ट्र गतिमान प्रगतीकडे नक्कीच वाटचाल करेन असा विश्वास मला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Maharashtra Politics | ‘गेली शिवशाही, आली गुंडशाही’ , विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा जोरदार निषेध

जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही, दोषी असेन तर राजकारणातून संन्यास घेईन : Rajesh Tope

Interim Budget | राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी आवश्यक ध्येयधोरणांची अर्थसंकल्पातून अंमलबजावणी