अश्विनी जगताप यांना पहिल्या फेरीत ४०४५ मतं; विरोधकांना किती मिळाली मतं?

Pune – पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार (Chinchwad Bypoll Election Result) संघातील पोटनिवडणुकीची आज कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी होत आहे. कसबा मतदार संघाची मतमोजणी कोरेगाव पार्क मधील धान्य गोदामात तर चिंचवड मतदार संघाची मतमोजणी थेरगाव इथल्या शंकरराव गावडे कामगार भवनात होत आहे. दोन्ही मतदार संघात झालेलं मतदान लक्षात घेता कसबा मतदार संघात मतमोजणीच्या 20 फेऱ्या तर चिंचवडमध्ये 37 फेऱ्या होण्याची शक्यता आहे.
कसब्यात कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे हेमंत रासने यांच्यात लढत होत असून चिंचवड मध्ये राष्ट्रवादीचे नाना काटे, भाजपच्या अश्विनी जगताप (Ashwini Jagtap), आणि अपक्ष राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.

दरम्यान, चिंचवडमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून पोस्टल मतांमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी आघाडी घेतली आहे. सोबतच आता मतमोजणीच्या पहिल्या फेरीत देखील ही आघाडी कायम आहे. चिंचवडमध्ये भाजपा उमेदवार अश्विनी जगताप यांना ४०४५ मतं, मविआच्या नाना काटेंना ३६०० मतं तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंना १२७३ मतं मिळाली आहे.