देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतली नीलम ताईंची सांत्वनपर भेट

देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतली नीलम ताईंची सांत्वनपर भेट

पुणे :  20 फेब्रुवारी रोजी विधान परिषद उपसभापती डॉ.  नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्या मातोश्री श्रीमती लतिका दिवाकर गोऱ्हे यांचे दुःखद निधन झाल्याचे वृत्त समजताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार (Ajit Pawar) यांनी नीलमताईंची पुण्यामध्ये त्यांच्या घरी भेट घेतली.

या भेटीदरम्यान या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच आगामी अधिवेशनात करावयाच्या कामकाजाबाबत या दोन्ही मान्यवरांची डॉ. गोऱ्हे यांच्या सोबत चर्चा झाली. यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी आईबाबत काही आठवणी सांगितल्या. त्या म्हणाल्या, ‘आमची आई लतिकाताई या देवावर अपार श्रद्धा असलेल्या सालस व्यक्ती होत्या. आई आणि मुलींच्या मध्ये असलेले भावनिक नाते आणि जिव्हाळा हा अधिक दृढ असल्याने त्यांच्याकडून आलेले संस्कार कायमच उपयोगात आले. सुशिक्षित आणि सुसंस्कृत यातील फरक आईने आम्हाला नेहमीच समजावून सांगितला. यामुळे सामाजिक जाणीवा विकसित झाल्या.’

यावेळी डॉ. गोऱ्हे यांच्या भगिनी जेहलम जोशी, आ. राजेश राठोड, माजी महापौर प्रशांत जगताप, अंकुश काकडे, बाळासाहेब बोडके, उदय महाले आदी उपस्थित होते. तर गृहमंत्री फडणवीस यांच्या भेटीच्या वेळी शिवसेना पुणे शहरप्रमुख गजानन थरकुडे, नगरसेवक विशाल धनावडे, शिरीष फडतरे, भाजपा पदाधिकारी जगदीश मुळीक, राजू विटकर, युवराज शिंगाडे,  आदी उपस्थित होते.

दरम्यान,  महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस, शिवसेनेचे नेते माजी मंत्री आ. आदित्य ठाकरे, मा. दिवाकर रावते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, यांनी आज नीलमताईंना दूरध्वनी करून आपल्या श्रद्धांजलीपर भावना कळविल्या आहेत. याच बरोबर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी खासदार श्रीनिवास पाटील, संजय दत्त,आ. दिलीप वळसे पाटील, डॉ. अमोल कोल्हे, आ. सत्यजित तांबे, सनदी अधिकारी श्याम वर्धने, विधान मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत, महेंद्र काज,  यांनीही शोकसंदेश पाठविले आहेत.

Previous Post

विरोधकांना संपवण्याचा सत्ताधारी पक्षांचा डाव आहे का? नाना पटोले यांचा सरकारवर हल्लाबोल

Next Post
सोलापूर : विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी तसेच टॉवर बांधकामासाठी एक कोटी रुपये मंजूर  

सोलापूर : विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी तसेच टॉवर बांधकामासाठी एक कोटी रुपये मंजूर  

Related Posts
Rahul Gandhi | राहुल गांधी यांना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचा आदेश, सावरकर यांच्याबद्दलचे वादग्रस्त वक्तव्य प्रकरण

Rahul Gandhi | राहुल गांधी यांना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचा आदेश, सावरकर यांच्याबद्दलचे वादग्रस्त वक्तव्य प्रकरण

वीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांना 19 ऑगस्ट रोजी न्यायालयात…
Read More
जाणून घ्या ऋषभ पंतचा अपघात नेमका कसा झाला ? मर्सिडीज जळून राख झाली

जाणून घ्या ऋषभ पंतचा अपघात नेमका कसा झाला ? मर्सिडीज जळून राख झाली

नवी दिल्ली –  भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचा शुक्रवारी सकाळी अपघात झाला (Rishabh Pant’s accident) . हा अपघात इतका…
Read More
"जर मी गोळी मारली असती तर थेट...", गोविदांच्या पत्नीचे मोठे विधान

“जर मी गोळी मारली असती तर थेट…”, गोविदांच्या पत्नीचे मोठे विधान

Sunita Ahuja | गोविंदा गेल्या वर्षी चर्चेत आला जेव्हा त्याने चुकून स्वतःवर गोळी झाडली. तो बंदूक साफ करत…
Read More