भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द, मात्र ‘या’ तारखेला पुन्हा भिडू शकतात संघ! जाणून घ्या समीकरण

IND vs PAK: भारत विरुद्ध पाकिस्तान  (India vs Pakistan) यांच्यात पल्लेकल्ले येथे झालेला आशिया चषक (Asia Cup 2023) सामना पावसामुळे रद्द झाला. पहिल्या षटकापासून सातत्याने पाावसामुळे काही मिनिटे खेळ थांबवावा लागला. परिणामी भारताच्या फलंदाजीनंतर सामना रद्द करण्यात आला.

या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र पाकिस्तानी गोलंदाजांच्या प्रदर्शनापुढे भारतीय फलंदाजांची कोंडी झाल्याने त्याचा निर्णय फसल्याचे दिसले. कर्णधार रोहित शर्मा (११ धावा) आणि विराट कोहली (०४ धावा) यांनी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर नांग्या टाकल्या. शुबमन गिल, श्रेयस अय्यर हे वरच्या फळीतील फलंदाजही आपल्या बॅटची जादू शकले नाहीत.

शेवटी इशान किशन आणि हार्दिक पंड्या यांनी भारतीय संघाची लाज राखली. इशानने ८१ चेंडूत ८२ धावा केल्या. तर हार्दिकने ९० चेंडू खेळताना ८७ धावा जोडल्या. या दोघांच्या चिवट खेळींमुळे भारतीय संघ २६६ धावांपर्यंत मजल मारू शकला. मात्र भारताचा डाव संपल्यानंतर पावसाला सुरुवात झाली, ज्यामुळे पाकिस्तानची फलंदाजी होऊ शकली नाही. सुमारे दोन तास प्रतीक्षा केल्यानंतरही परिस्थिती योग्य नसताना सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही संघाना १-१ गुण दिला आहे.

१० तारखेला पुन्हा भिडणार भारत पाकिस्तान?
भारताविरुद्धचा सामना रद्द होऊनही पाकिस्तानचा संघ सुपर-४ मध्ये पोहोचला आहे. पाकिस्तानच्या टीमने पहिल्या सामन्यात नेपाळवर २३८ धावांनी मोठा विजय मिळवला होता. भारतीय संघालाही सुपर-४ मध्ये पोहोचण्याची सुवर्णसंधी आहे, कारण ब्लू टीमचा पुढचा सामना ४ सप्टेंबरला नेपाळसोबत आहे. जर भारताने नेपाळचा पराभव केला तर १० तारखेला सुपर – ४ मध्ये पुन्हा एकदा आमनेसामने येतील.

येथे वाचा आणखी बातम्या-

भारत वि. पाकिस्तान सामन्यात पावसाचा विजय, इशान आणि हार्दिकच्या झुंजार खेळी पाण्यात

Jalna Lathicharge Case : सुप्रिया ताई, सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र पेटवू नका; चित्रा वाघ यांची विनंती

Maratha Reservation : आंदोलनाच्या वेळी झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी – शिंदे

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; शरद पवारांनी सांगितलं याला नेमकं कोण आहे जबाबदार