INDvsPAK: आफ्रिदीपुढे रोहितची होऊ शकते कोंडी, भारत-पाकिस्तान सामन्यात गेमचेंजर ठरतील ‘हे’ खेळाडू?

Asia Cup 2023: आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतला भारताचा पहिला सामना आज पाकिस्तान (IND vs PAK) बरोबर होणार आहे. श्रीलंकेत कँडी इथं हा सामना होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी तीनला सामना सुरू होईल. दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ चार वर्षांपूर्वी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आमने सामने आले होते. सध्या सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत ‘अ’ गटात भारत आणि पाकिस्तानबरोबर नेपाळचा समावेश आहे, तर ‘ब’ गटात श्रीलंका बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. दोन्ही गटांमधले दोन आघाडीचे संघ अंतिम चारमध्ये जातील. ‘अ’ गटातून भारत आणि पाकिस्तान अग्रणी राहिले, तर येत्या 10 सप्टेंबरला पुन्हा त्यांचा सामना होईल.

दरम्यान, या सामन्यात जे खेळाडू गेमचेंजर ठरू शकतात त्यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), कोहली, कुलदीप यादव, बाबर आझम,शाहीन आफ्रिदी यांच्यासह अन्य खेळाडूंचा यात समावेश आहे. शर्माचा डावखुरा वेगवान गोलंदाजांविरुद्धचा विक्रम चांगला राहिला नाही. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि रोहित शर्मा यांच्यात रंजक लढत पाहायला मिळणार आहे.

त्याचप्रमाणे भारतीय फलंदाज विराट कोहली आणि पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हारिस रौफ यांच्यातही रंजक लढत पाहायला मिळणार आहे. वास्तविक, हरिस रौफ आपल्या वेगामुळे विराट कोहलीसाठी अडचणीचे कारण बनू शकतो.

त्याचबरोबर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसाठी आव्हान असेल. जसप्रीत बुमराह ज्या फॉर्ममध्ये आयर्लंडविरुद्ध दिसला होता, त्यामुळे तो बाबर आझमसाठी मोठा धोका ठरू शकतो, असे मानले जात आहे.

पाकिस्तानचा फलंदाज इफ्तिखार अहमदने नेपाळविरुद्धच्या सामन्यात झंझावाती शतक झळकावले, पण तो भारताविरुद्धच्या पराक्रमाची पुनरावृत्ती करू शकेल का? भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव इफ्तिखार अहमदसाठी मोठे आव्हान ठरू शकतो.

विराट कोहली आणि बाबर आझम हे सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणले जातात. पण भारत-पाकिस्तान सामन्यात कोणता फलंदाज दिसणार? मात्र, क्रिकेट चाहत्यांच्या नजरा विराट कोहली आणि बाबर आझमच्या फलंदाजीवर असणार आहेत.

येथे वाचा आणखी बातम्या-

Jalna Lathicharge Case : सुप्रिया ताई, सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र पेटवू नका; चित्रा वाघ यांची विनंती

Maratha Reservation : आंदोलनाच्या वेळी झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी – शिंदे

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; शरद पवारांनी सांगितलं याला नेमकं कोण आहे जबाबदार

Jalna Lathicharge Case : राज ठाकरेंनी सरकारला झाप झाप झापलं; मराठा समाजाला केले ‘हे’ आवाहन