Video: इशानच्या विकेटनंतर पाकिस्तानी गोलंदाज म्हणाला, ‘चल निघ इथून’; मग हार्दिकने असा उतरवला माज

IND vs PAK: भारत विरुद्ध पाकिस्तान  (India vs Pakistan) यांच्यात पल्लेकल्ले येथे झालेला आशिया चषक (Asia Cup 2023) सामना पावसामुळे रद्द झाला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र पाकिस्तानी गोलंदाजांच्या प्रदर्शनापुढे भारतीय फलंदाजांची कोंडी झाल्याने त्याचा निर्णय फसल्याचे दिसले. कर्णधार रोहित शर्मा (११ धावा) आणि विराट कोहली (०४ धावा) यांनी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर नांग्या टाकल्या. शुबमन गिल, श्रेयस अय्यर हे वरच्या फळीतील फलंदाजही आपल्या बॅटची जादू शकले नाहीत.

शेवटी इशान किशन (IShan Kishan) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांनी भारतीय संघाची लाज राखली. इशानने ८१ चेंडूत ८२ धावा केल्या. तर हार्दिकने ९० चेंडू खेळताना ८७ धावा जोडल्या. या दोघांच्या चिवट खेळींमुळे भारतीय संघ २६६ धावांपर्यंत मजल मारू शकला. इशानला पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस राऊफेने बाद केले.

इशानची मोठी विकेट हाती आल्याने हॅरिस राऊफचे त्याच्या भावनांवरील नियंत्रण सुटले. हॅरिसने भारतीय यष्टीरक्षकाकडे रागाने बघत त्याला हाताने इशारा करून बाहेर जाण्यास सांगितले. यावर ईशानने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण, हार्दिक पांड्याने ही संपूर्ण घटना दुसऱ्या टोकाकडून पाहिली आणि त्याने हॅरिसचा व्याजासकट सूड घेतला.

हार्दिकने ईशानचा बदला घेतला
भारतीय डावातील ४०वे षटक टाकण्यासाठी हॅरिस आला आणि या षटकात पंड्याने तीन चौकार मारून इशानकडे बोट दाखवल्याचा बदला घेतला. ३ चौकार मारल्यानंतर हॅरिसचा गर्व उतरला. दुसरीकडे हार्दिकलाही शतक पूर्ण करता आले नाही. त्याने ८७ धावांची खेळी खेळली. हार्दिकने७7 चौकार आणि १षटकार लगावला. हार्दिक आणि ईशानमध्ये पाचव्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी झाली.

येथे वाचा आणखी बातम्या-

भारत वि. पाकिस्तान सामन्यात पावसाचा विजय, इशान आणि हार्दिकच्या झुंजार खेळी पाण्यात

भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द, मात्र ‘या’ तारखेला पुन्हा भिडू शकतात संघ! जाणून घ्या समीकरण

Jalna Lathicharge Case : सुप्रिया ताई, सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र पेटवू नका; चित्रा वाघ यांची विनंती

Maratha Reservation : आंदोलनाच्या वेळी झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी – शिंदे