Asian Games: भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा जिंकलं ‘सोनं’, रौप्यपदकही भारताच्या खिशात

Neeraj Chopra Won Gold Medal In Asian Games: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) आशियाई क्रीडा स्पर्धेतील (Asian Games 2023) भालाफेक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले आहे. त्याने 88.88 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नाने सुवर्णपदक पटकावले. दरम्यान, भारतीय भालाफेकपटू किशोर जेनाने 87.54 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नाने रौप्यपदक जिंकले. नीरजने 2018 जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. त्याचबरोबर किशोरची ही पहिलीच आशियाई स्पर्धा असून त्याने रौप्यपदक पटकावले. जेनाचे हे कोणत्याही स्पर्धेतील पहिले पदक आहे. जपानच्या गेन्की डीनने 82.68 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह तिसरे स्थान पटकावले.

भालाफेक हा 1951 पासून आशियाई क्रीडा स्पर्धेचा भाग आहे. या स्पर्धेत भारताच्या दोन खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावण्याची 72 वर्षांमध्ये ही पहिलीच वेळ आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भालाफेक प्रकारात भारताची आता पाच पदके झाली आहेत. या दोन पदकांच्या आधी, पारसा सिंगने 1951च्या दिल्ली आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य, गुरतेज सिंगने 1982च्या दिल्ली आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक आणि 2018च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजने सुवर्णपदक जिंकले होते. त्याचवेळी, आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेकमध्ये भारताने दोन पदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

महत्वाच्या बातम्या-

AAP खासदार संजय सिंह यांना ED ने दीर्घ चौकशीनंतर अटक केली

Gram Panchayat Election : राज्यभरातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक जाहीर

Puneet Balan : अनधिकृत जाहिरात लावल्याने ३.२० कोटीचा दंड; पुनीत बालन यांना नोटीस