बीडच्या सुपुत्राचा आणखी एक पराक्रम, अविनाश साबळेने आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकलं दुसरं पदक

Avinash Sable: राष्ट्रीय विक्रमधारक अविनाश साबळे याने बुधवारी पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीत (5000 Meter Athletics) ऐतिहासिक रौप्यपदक (Silver Medal) जिंकले. आशियाई क्रीडा (Asian Games) 1982 नंतर या स्पर्धेत भारताचे हे पहिले पदक आहे. याच शर्यतीत आणखी एक भारतीय गुलवीर सिंग चौथ्या स्थानावर राहिला. तत्पूर्वी, अविनाश साबळेने रविवारी पुरुषांच्या 3,000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

बीडचा राहणारा अविनाशच्या उत्कृष्ट कामगिरीने 3,000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत मागील आशियाई क्रीडा स्पर्धेतील विक्रम मोडला. त्याने 8 मिनिटे आणि 19.50 सेकंदात शर्यत पूर्ण करून आशियाई क्रीडा 2018 मधील इराणच्या होसेन केहानीचा विक्रम मागे टाकला. यापूर्वी हा विक्रम 8 मिनिटे 22.79 सेकंदांचा होता.

महत्वाच्या बातम्या-

AAP खासदार संजय सिंह यांना ED ने दीर्घ चौकशीनंतर अटक केली

Gram Panchayat Election : राज्यभरातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक जाहीर

Puneet Balan : अनधिकृत जाहिरात लावल्याने ३.२० कोटीचा दंड; पुनीत बालन यांना नोटीस