Urfi Javed : ‘तुझ्यामुळे आमची मुलं बिघडतात’, तक्रार करणाऱ्या पालकांच्या कानामागे उर्फीनं काढला कानामागे जाळ

Uorfi Javed: उर्फी जावेद (urfi Javed) ही तिच्या अतरंगी फॅशनबरोबरच तिच्या निर्भीड वक्तव्यांसाठीही प्रसिद्ध आहे. आता उर्फीविषयी आणखी एक बातमी समोर आली आहे. त्यात तिनं वेगळ्याच गोष्टीवर खुलासा केला आहे. २५ वर्षांच्या उर्फीनं काल तर भन्नाट पोस्ट शेयर केली होती. त्यात तिनं गुपचूप साखरपुडा उरकल्याचे दिसून आले होते. त्यावरुनही तिला नेहमीप्रमाणे चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. इंडिया टुडे कॉनक्लेवमध्ये सहभागी झालेल्या उर्फीनं तिच्या स्वभावाप्रमाणे मत व्यक्त केले आहे.

दरम्यान एका महिलेनं उर्फीला प्रश्न विचारला. उर्फी तुझ्यामुळे माझ्या लहान मुलांच्या मनावर विपरित परिणाम होतो आहे. असे तिनं म्हटलं. यावर उर्फीनं देखील त्या महिलेला परखड शब्दांत उत्तर दिल्याचे दिसून आहे. उर्फी म्हणाली, तुमची मुलं आहेत. आणि तुम्हीच त्यांना जन्म दिला आहे. त्यामुळे ती कुणामुळे बिघडत असतील असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांना शिकवण्याची गरज आहे. त्याचा दोष मला का देता, आणखी एका महिलेनं तिच्या मुलावरुन उर्फीला प्रश्न विचारला तेव्हाही तिनं तिखटपणे त्यांना उत्तर दिलं.

तुम्ही जेव्हा तुमच्या पतीकडून मार खाता तेव्हा ते उदाहरण खूपच चांगले असते का तुमच्या मुलीसाठी. त्यामुळे ती काही माझी मुलं नाहीत. त्यामुळे मी त्यांची जबाबदारी का घेऊ, मी कुणी राजकीय व्यक्ती नाही की तुमची जबाबदारी घ्यायला. मनोरंजन क्षेत्रात काम करते. आणि मी माझे काम करते आहे. असेही उर्फीनं यावेळी सांगितले.