रामदास आठवलेंची तिरकी चाल; विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात उमेदवार उभे करणार

Ramdas Athawale : काही दिवसात मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या एकूण ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू होणार आहेत. या राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी भाजप आणि काँग्रेससह सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मात्र, दरम्यान, भाजपप्रणीत एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी भाजपची अडचण होऊ शकते, अशी खेळी केली आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले आम्ही एनडीएचे मित्रपक्ष आहोत, त्यामुळे भाजपला पाठिंबा देणे चांगले होईल. त्यामुळे आम्ही मध्य प्रदेशातील सर्व 229 जागांवर उमेदवार न उभे करून भाजपला पाठिंबा देत आहोत. आमचा विश्वास आहे की मध्य प्रदेशात भाजपचे राज्य आहे. निवडून येईल. छत्तीसगडमध्ये आम्ही सर्व 90 जागांवर भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु इतर दोन राज्ये, तेलंगणा आणि राजस्थानमध्ये आम्ही 15-20 जागांवर निवडणूक लढवू.

रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातही दोन जागांची मागणी केली होती. रिपब्लिकन पक्षाला दोन जागा मिळाल्या आणि दोन जागांवर निवडून आल्यास रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्रात मान्यताप्राप्त पक्ष होऊ शकतो, असे ते म्हणाले होते. यासोबतच शिर्डीतून निवडणूक लढवण्याची संधी मिळाल्यास विचार करू, असेही आठवले म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-

मी पुन्हा येईन… फडणवीस पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार? भाजपाकडून संकेत

सणासुदीत कांद्याने केला वांदा, भाव गगनाला भिडले

मंदिर वही बनायेंगे : या दिवशी रामलल्ला गर्भगृहात विराजमान होणार