यूपी, गोवा आणि उत्तराखंडमधील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

नवी दिल्ली- पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सध्या देशात सुरू आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यातील राजयकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचा पहिला टप्पा 10 फेब्रुलारीला पार पडला होता.

आता पुढच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया 14 फेब्रुवारीला पार पडणार आहे. उत्तराखंड आणि गोवा विधानसभेच्या येत्या 14 फेब्रुवारीला एका टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे.

उत्तराखंडमधील 70 मतदारसंघांमध्ये, गोव्यातील 40 मतदारसंघांमध्ये तर उत्तर प्रदेशाच्या 55 मतदारसंघांमध्ये या टप्प्यात मतदान होणार आहे. या सर्व राज्यात आता प्रचार शिगेला पोचला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल उत्तर प्रदेशात कासगंज जिल्ह्यात प्रचारसभा घेतली.

राज्यातलं भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं काम करत असून राज्यातल्या कोणालाही रोजगारासाठी बाहेर जावं लागू नये, यासाठी प्रत्येक युवकाला रोजगार द्यायचा सरकारचा प्रयत्न आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं.