Ajit Pawar | आपल्याला फक्त साहेबांना विजयी करायचं आहे, सख्ख्या भावानंतर वहिनीनेही अजितदादांकडे फिरवली पाठ

अजित पवार (Ajit Pawar) हे बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळे झाले आणि महायुतीसोबत हात मिळवत उपमुख्यमंत्रीपद मिळवले. या बंडखोरीनंतर आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघात आमनेसामने असणार आहेत. संपूर्ण पवार कुटुंब आता बारामती लोकसभेच्या लढतीसाठी रणांगणात उतरले आहे. अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारांनी (Shrinivas Pawar) अजित दादांच्या भूमिकेला विरोध केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी शर्मिला पवार (Sharmila Pawar) यांनी सुद्धा दादांच्या विरोधी भूमिका घेतली आहे.

बारामतीतील काटेवाडी येथे बोलताना अजित पवारांच्या वहिनी शर्मिला पवार म्हणाल्या, आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. हा काळ संवेदनशील आणि दुःखदायक आहे. तुम्ही सर्वजण कुटुंबाचे भाग आहात. कुणाला विरोध करायचा नाही. कुटुंब म्हटले की भांड्याला भांड लागतं. पण आपल्या कुटुंबात असे कधी घडले नाही. आपण त्यावर मात करतो तसा प्रयत्न करत आहे. आपल्या सगळ्यांच्या घरी वडीलधारी आहेत. आपली ओळख शरद पवारांमुळे आहे. त्यांचे विरोधक देखील साहेबांचं नाव घेतात, असे शर्मिला पवार म्हणाल्यात.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

वडीलधारी लोकांचा मान ठेवलं पाहिजे. साहेबांनी आपल्यासाठी काय केलं हा प्रश्न विचारणे म्हणजे आई आणि वडिलांनी माझ्यासाठी काय केलं असं विचारल्यासारखे आहे. शेवटी कुटुंब वडीलधारी लोकांपासून सुरू होते. साहेबांनी इतक्या वर्षात मात खाल्ली आहे का? आपण त्याला कारणीभूत होऊया का? आपण त्याला गालबोट लावायचं का? असा सवाल शर्मिला पवार यांनी उपस्थित केला. तसेच, कुणाला यश मिळत हा मुद्दाच नाही, पण आपल्याला फक्त साहेबांना विजयी करायचं आहे, असेही शर्मिला पवार म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या :

वन इलेक्शन, वन नेशन आणि नो इलेक्शन करण्याचा भाजपा डाव, लोकशाही व्यवस्था धोक्यातः Jairam Ramesh

‘शिवसेना फोडून मविआ सरकार पाडण्यासाठी भाजपाने वापरला ईलेक्टोरोल बाँडचा पैसा’

मोहोळांचा भर पक्षांतर्गत भेटीगाठींवर! अनिल शिरोळे, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, योगेश गोगावले यांच्या भेटी