राज्यात अनैतिक युती करून महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं – भाजपा

दौंड – आजचे आंदोलन हे या आघाडी सरकारला आपण देत असलेला इशारा आहे .आज नऊ दिवस झाले संपूर्ण राज्यातील विद्युत पुरवठा या सरकारने बंद केला आहे . अनैतिक युती करून हे सरकार सत्तेत आलेलं आहे . राज्यात अलिबाबा आणि ४० चोरांची टोळी सत्तेत आलेली आहे असा घणाघाती आरोप भाजपा किसान मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे यांनी केला .

वीज पंपाची वीज तोडु नये, तोडलेली वीज कनेक्शन तातडीने जोडावेत , शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात येऊ नये या मागण्यांसाठी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कार्यालय दौंड येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. भाजपा किसान मोर्चाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काळे हे बोलत होते.

आटली की बाटली कचकन फुटली… वीज पुरवठा खंडित करायला लाज नाही वाटली… खंडित वीज पुरवठा सुरू झालाच पाहिजे… शेतकरी एकजुटीचा विजय असो, एकच चर्चा किसान मोर्चा, अरे कोण म्हणतो देत नाय… घेतल्याशिवाय राहत नाही अशी घोषणाबाजी या आंदोलना वेळी आंदोलकांनी केली.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोकहिताचे कार्यक्रम राबवा; छगन भुजबळ यांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश

Next Post

‘मराठवाड्यातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी जे शक्य आहे ते करणे मी माझी जबाबदारी समजतो’

Related Posts
'... तर शिंदे गटाचे फक्त १६ नव्हे तर ३९ आमदार अपात्र ठरू शकतात'

‘… तर शिंदे गटाचे फक्त १६ नव्हे तर ३९ आमदार अपात्र ठरू शकतात’

Maharashtra Political crises – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरातील चर्चा आणि सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या सुनावणीसाठी आज…
Read More
avinash bhosale

अविनाश भोसलेंचा ताबा घेण्यास ईडीला परवानगी

मुंबई – डीएचएफएल मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भातील (DHFL money laundering case) चौकशीसाठी उद्योजक अविनाश भोसले (Avinash Bhosale)यांचा ताबा मिळावा…
Read More
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये लोकप्रतिनीधीही असुरक्षित : नाना पटोले

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये लोकप्रतिनीधीही असुरक्षित : नाना पटोले

मुंबई  – काँग्रेसच्या महिला आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांच्यावर केलेला हल्ला हा महाराष्ट्रात गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे उदाहरण आहे.…
Read More