राजस्थानमधील वाढत्या दलित अत्याचाराच्या घटना पाहून रामदास आठवले संतापले 

मुंबई – राजस्थानमधील वाढते दलित अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकार ने  अधिक लक्ष दिले पाहिजे. राजस्थानचे  मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी  दलित अत्याचार प्रकरणी काढलेले अनुद्गार निषेधार्ह आहेत. अन्य राज्यात ही दलितांवर अत्याचार होतात असे दलितांच्या भावना दुखविणारे वक्तव्य मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले असून राजस्थानमधील दलित अत्याचराच्या घटनेचा तीव्र निषेध रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केला आहे.

राजस्थानमधील दलित विद्यर्थ्याने शिक्षकांसाठी राखीव माठातून पाणी पिल्याच्या जातीय द्वेषातून अवघ्या 9 वर्षांच्या दलित विद्यार्थ्यांची शिक्षकाने मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आली या घटनेचा रामदास आठवले यांनी तीव्र निषेध केला असून या घटनास्थळी  रामदास आठवले भेट देणार आहेत.

रामदास आठवले हे शनिवार  दि.20 ऑगस्ट रोजी  राजस्थान मधील जालोर (Jalore) च्या  सुराणा गावात  भेट देणार आहेत. शिक्षकाच्या जातीय द्वेष भावनेचा बळी ठरलेल्या दलित विद्यर्थ्यांच्या कुटुंबियांची ना.रामदास आठवले सांत्वनपर भेट घेणार आहेत. तसेच जालोर मधील दलित समाजाचे संत राविनाथ महाराज  यांनी आत्महत्या केली त्या  जालोर मधील राजपूरा या गावात  रामदास आठवले भेट देणार आहेत. जालोर मध्ये भेट देऊन दलित अत्याचारांच्या प्रकरणाचा तपासकामाची  आणि अधिक माहिती ना. रामदास आठवले घेणार आहेत.