‘शिवसेनेची गोव्यातील कामगिरी बघून पुतीन टेन्शन मध्ये’

मुंबई – ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर आले असून पंजाब वगळता ४ राज्यात भाजपा सरकार स्थापन करणार असल्याचे चित्र आहे. भाजप आप आणि समाजवादी पार्टी वगळता कोणत्याही पक्षाला या निवडणुकीत समाधानकारक कामगिरी करता आलेली नसल्याचे दिसून येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची तर खूपच बिकट अवस्था असून नोटा पेक्षा देखील कमी मते या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना मिळाली आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेशात मंत्री आणि गोव्यात सरकार स्थापन करण्याच्या शिवसेनेचा दावा आता किती हास्यास्पद होता हे देखील समोर आले आहे. सोशल मिडीयावर आता सेनेची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. सेनेप्रमानेच राष्ट्रवादीची देखील अवस्था असून खासदार शरद पवार यांना देखील ट्रोल केले जाऊ लागले आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनी याच मुद्यावरून शिवसेनेची चांगलीच खिल्ली उडवली आहे. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, गोवा राज्यात शिवसेनेला मिळालेले एकूण मतदान – 1718 शिवसेनेची ही कामगिरी बघून पूतीन टेन्शन मध्ये असल्याचं राणे यांनी म्हटले आहे.