तांत्रिक पध्दतीच्या बाबी उपस्थित करत सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केला गेला – सुनिल तटकरे

Sunil Tatkare- खरंतर आज मेरीटवर युक्तीवाद होण्याची आवश्यकता होती परंतु तांत्रिक पध्दतीच्या बाबी उपस्थित करत सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केला गेला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना केला.

आज अडीच लाखापेक्षा जास्त शपथपत्र आमच्याकडून दाखल झाली होती. तेव्हा पळवाटा शोधण्यासाठी अतिशय अल्प अशा शपथपत्रावर काही त्रुटी आहेत अशा पध्दतीने सांगण्याचा प्रयत्न केला गेला असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले.

सलग सुनावणी व्हावी अशी आमची मागणी होती. त्यानुसार २० नोव्हेंबरपासून सलग सुनावणी होणार आहे. तांत्रिक त्रुटी आहेत त्या न्यायालयासमोर आणण्याचा प्रयत्न केला जाईल असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

यावेळी मुंबई विभागीय अध्यक्ष आणि माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार व ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

दिवाळीत प्रदूषण करणारे फटाके टाळावेत; विद्याताई चव्हाण यांचे नागरिकांना आवाहन

बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी धडा शिकवला..

‘सरकारने मराठा आरक्षणावर एकमत केलं पाहिजे; मुख्यमंत्री एक बोलतात, उपमुख्यमंत्री दुसरं बोलतात’