अस्लम शेख यांच्यावर १,००० कोटी रुपयांचा मढ मार्वे स्टुडिओ घोटाळा केल्याचा आरोप

मुंबई – माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार अस्लम शेख (Congress MLA Aslam Sheikh) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शेख यांना राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने मढ मार्वे स्टुडिओ प्रकरणी नोटीस पाठवली आहे. यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी अस्लम शेख यांच्यावर १,००० कोटी रुपयांचा मढ मार्वे स्टुडिओ घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, अस्लम शेख यांनी १ हजार रुपयांचा मढ मार्वे स्टुडिओ (Madh Marve Studio) घोटाळा केला आहे.या प्रकरणी महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने अस्लम शेख व त्यांच्या मित्रांना नोटीस पाठवल्या आहेत. मुंबई जिल्हाधिकारी व मुंबई महापालिकेला ताबडतोब कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.