Sharad Pawar | गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्य जनतेला केवळ फसवण्याचं काम झाले

Sharad Pawar | केंद्रातील सरकारने गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्य जनतेला केवळ फसवण्याच काम केल आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील महाविकास आघाडीच्या जाहीर सभेतून केला आहे.

महाविकास आघाडीचे बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या जाहीर सभेतून शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

शरद पवार (Sharad Pawar ) म्हणाले की, पेट्रोल, गॅस सिलेंडर आणि नोकऱ्यांच्या आघाडीवर सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम केली. शब्द द्यायचा, आश्वासनं द्यायची आणि ती पाळायची नाहीत, अशी जर मोदी नीती असेल तर त्यांना पुन्हा सत्तेत न बसविण्याचे आवाहन शरद पवार यांनी जनतेला केले आहे.

पुढे शरद पवार म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने शेतकरी, महिला, रोजगार या बाबत दिलेली आश्वासने आणि वस्तुस्थिती यात फरक आहे. दरवर्षी दोन कोटी मुलांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. पण गेल्या दहा वर्षांत नोकऱ्या कमी आहे. सध्या देशातील तरुणाईचा जो आकडा आहे, त्यातील ८६ टक्के मुलं ही बेरोजगार आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. आजचा दिवस उमेदवारीचा अर्ज भरण्याचा दिवस आहे. कार्यकर्त्यांमध्ये आज प्रचंड उत्साह पाहण्यास मिळाला. त्यामुळे तुम्ही नक्कीच जोमाने काम करणार याचा मला विश्वास आहे. १० वर्षे सत्ता असणाऱ्या सत्ताधारी लोकांनी फसवलं आहे. २०१४ मोदी सत्तेत आले त्यावेळेस पेट्रोल ७१ रुपये लिटर होतं. आज पेट्रोल १०५ रुपये आहे. सत्तेचा उन्माद काय असतो ही बाब सत्ताधारी लोकांनी दाखवून दिली आहे. आता मोदींना सत्ता द्यायची नाही याचा निर्णय घ्यावा लागेल. मोदींवर टीका केली म्हणून झारखंडचे मुख्यमंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बंगालचे तीन मंत्री तुरुंगात गेले. देशातील लोकशाही उद्ध्वस्त होत आहे. सत्तेचा उन्माद काय असतो हे मोदींनी दाखवले आहे. मोदींचा पराभव करण्यासाठी तयार रहा.असेही शरद पवार म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Amol Kolhe | ‘आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले?’ करंदी ग्रामस्थांचा अमोल कोल्हेंना थेट सवाल

Murlidhar Mohol | मनसेच्या साथीनं महायुतीचे मताधिक्य वाढणार!, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अमित ठाकरेंची भेट

Narendra Modi | मोदीजींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन, शिंदेंचा विरोधकांवर घणाघात