‘आम्ही भारताला WTC फायनलमध्ये नेलं…’, ऑस्ट्रेलियन कर्णधाराचं वक्तव्य भारतीय चाहत्यांना खटकू शकतं

WTC 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया (INDvsAUS) यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा (World Test Championship) अंतिम सामना 7 जूनपासून लंडनमध्ये खेळवला जाईल. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. लंडनमधील ओव्हल मैदानावर बॉल आणि बॅटच्या लढतीपूर्वीच शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सचे असे विधान समोर आले जे कदाचित भारतीय चाहत्यांना आवडणार नाही.

ऑस्ट्रेलियन मीडिया सिडनी मॉर्निंग हेराल्डशी बोलताना कमिन्स (Pat Cummins) म्हणाले की, आम्ही भारताला डब्ल्यूटीसी फायनलमध्ये  (WTC Final) नेलं, बहुतेक हे लोक विसरले आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या आवृत्तीची आठवण करून, कमिन्सने असे विधान केले की, आम्ही भारताला याआधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत नेले होते, मला वाटते की लोक ते विसरले आहेत. कदाचित त्यावेळी आपल्याला त्याच्याबद्दल फारशी कल्पना आली नसावी कारण तेव्हा सर्व काही नवीन होते.

कमिन्स पुढे म्हणाले की, गेल्या वेळी डब्ल्यूटीसीच्या पहिल्या फायनलमध्ये न्यूझीलंडनेइंग्लंडमध्ये चांगला खेळ केला होता. आपण तिथे असायला हवे होते. हे लक्षात घेऊन आम्ही यावेळी खेळलो आणि पहिली संधी गमावल्यानंतर या वेळी आम्हाला आणखी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली.