ऑस्ट्रेलियन क्रिकेटर Andrew Symonds चा कार अपघातात मृत्यू

सिडनी – ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचे ( Andrew Symonds) (४६)  एका अपघातामध्ये निधन झाले आहे.शनिवारी (१४ मे २०२२) रात्री हा अपघात झाला. उत्तर-पूर्व ऑस्ट्रेलियातील टाऊन्सव्हिलजवळ हा कार अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,या अपघातामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाल्याची पुष्टी पोलिसांनी दिली. निवेदनानुसार, प्राथमिक माहितीनुसार त्याची कार रात्री ११ वाजता हेर्वे रेंज रोडवर होती. एलिस नदीच्या पुलाजवळ रस्त्यावरून उतरल्याने ती अचानक उलटली. घटनेच्या वेळी सिमंड्स हे वाहन चालवत होता. आपत्कालीन सेवांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ते अयशस्वी ठरले, असेही सांगण्यात आले. फॉरेन्सिक क्रॅश युनिट (Forensic crash unit) या प्रकरणाचा तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सायमंड्सचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. बराच काळ त्याने आपला ब्रिटिश पासपोर्ट वापरला. वास्तविक, तो लहान असताना त्याला एका इंग्रज जोडप्याने दत्तक घेतले होते आणि नंतर ते ऑस्ट्रेलियाला गेले. कांगारू क्रिकेटपटूला एकदा 90 च्या दशकात इंग्लंड अ संघाकडून खेळण्याची संधी मिळाली होती, परंतु त्याने ही ऑफर नाकारली.त्याचे वेस्ट इंडिजशीही संबंध आहेत. असे म्हटले जाते की त्याच्या जैविक पालकांपैकी एक आफ्रिकेचा होता, तर दुसरा युरोपचा होता.

याशिवाय  इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या आठव्या आवृत्तीत तो सर्वाधिक मानधन घेणारा परदेशी खेळाडू होता. त्यानंतर डेक्कन चार्जर्सने त्याला US$ 1.35 मिलियन मध्ये विकत घेतले. सायमंड्सने बॉलिवूड चित्रपटातही काम केले. तो 2011 चा सुपरस्टार अक्षय कुमार आणि ऋषी कपूर (Akshay Kumar and Rishi Kapoor) स्टारर ‘पटियाला हाउस’ (‘Patiala House’) मध्ये दिसला होता.