मुख्यमंत्र्यांचं हिंदुत्व नकली असल्याचं अवघ्या महाराष्ट्राला कळलं – सोमय्या

मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) काय उत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मुंबईत पार पडलेल्या सभेत त्यांनी अपेक्षेप्रमाणे आपल्या भाषणातून शिवसैनिकांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न तर केलाच सोबतच ठाकरे यांनी भाजपाचे हिंदुत्व (Hindutva) , केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर (Misuse of central systems) त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Leader of Opposition Devendra Fadnavis and MNS chief Raj Thackeray) यांचा समाचार घेतला.

दरम्यान, कालच्या या सभेवर सत्ताधारी आणि विरोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या सभेमध्ये भाजपवर झालेल्या टीकेनंतर आता भाजपचे धडाडीचे नेते किरीट सोमय्या सेनेवर बरसले आहेत. उद्धव ठाकरे तुमचं हिंदुत्व नकली आहे. अजाण बंद झाल्यानं उद्धव ठाकरे म्हणजेच त्यांचे प्रवक्ते संजय राऊत यांची बोबडी बंद झाली आहे. शिवसेनेचं हिंदुत्व नकली आहे, हे जनतेला कळलं आहे, असं सोमय्या म्हणाले.

किरीट सोमय्यांनी अलिबाग येथील कोरलई गावातील बंगल्यांवरुन उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. असली क्या है नकली क्या है, हे जनतेला समजलंय, असं सोमय्या म्हणाले. मुख्यमंत्र्यांचं हिंदुत्व नकली असल्याचं महाराष्ट्राला कळलं असल्याची टीका किरीट सोमय्यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला असली नकली शिकवू नये, असं सोमय्यांनी म्हटलं.