राम मंदिराबाबत मोठी अपडेट, अयोध्येत प्राणप्रतिष्ठेची तारिख आली समोर

अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या श्रीरामांच्या भव्य मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची विशेष तयारी सुरू आहे. वास्तविक, मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. पहिल्या टप्प्याचे काम या वर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

भव्य मंदिराच्या पहिल्या मजल्याच्या बांधकामाला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. राम मंदिर तीन टप्प्यात बांधले जाणार आहे. मात्र, पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर तात्पुरत्या मंदिरात रामलल्लाची स्थापना त्यांच्या गर्भगृहात करण्यात येणार आहे. प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 10 दिवस चालणार आहे. 15 ते 24 जानेवारी या कालावधीत हा सोहळा पूर्ण होणार आहे. 24 ते 25 जानेवारी दरम्यान रामलल्लाचा दरबार सर्वसामान्य भाविकांसाठी खुला होणार आहे. त्यानंतर रामलल्ला आपल्या भव्य मंदिराच्या गर्भगृहातून भाविकांना दर्शन देतील.