अकबरुद्दीन ओवेसी औरंगजेबाच्या कबरीवर फुले  वाहून झाले नतमस्तक 

औरंगाबाद – एमआयएमचे नेते  अकबरुद्दीन औवेसी (MIM leader Akbaruddin Owaisi) औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज शहरातील धार्मिळ स्थळ आणि दर्ग्यांना भेटी दिल्या. विशेष म्हणजे त्यांनी  स्वराज्याचा शत्रू असणाऱ्या मुगलसम्राट औरंगजेबच्या (Aurangzeb)  कबरीवर फुले वाहिली आणि ते नतमस्तक झाले. (Akbaruddin Owaisi at the tomb of Aurangzeb)

सुरुवातीला येथील मस्जिदीत नमाज देखील अदा केली. त्यानंतर खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiaz Jalil ), एमआयएम नेते वारीस पठाण आणि स्थानिक नेत्यांसह अकबरुद्दीन ओवेसी औरंगजेबाच्या कबरीवर गेले. कबरीवर फुलं वाहून ( Owesani laid flowers at Aurangzeb’s tomb ) पुढच्या कार्यक्रमाला मार्गस्त झाले. दरम्यान, स्वराज्याच्या शत्रूचे उदात्तीकरण केल्याने त्यामुळे राजकीय वाद निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.