एकनाथ शिंदे सोडून सगळे शिवसेनेत येतील, आम्ही शिंदेंना पक्षात घेणार नाही – संजय राऊत

Sanjay Raut : लवकरच भाजपाला (BJP) जोडून गेलेले शिवसेनेत येणार आहेत. मात्र एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) येणार नाही, त्यांना आम्ही घेणारही नाहीत, अशी टीका खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज केली आहे.

नाशिकमध्ये बोलताना संजय राऊत म्हणाले की, सध्याचे राजकारण लोकांना ठावूक झाले आहे. लोक वैतागले आहे. सरकार ज्याप्रमाणे काम करत आहे. लवकरच हे सरकार पडणार असून शिवसेनेतून बाहेर पडलेला गट पुन्हा शिवसेनेत येणार आहे. मात्र एकनाथ शिंदे वगळता सर्व शिवसेनेत येतील, शिवाय आम्ही एकनाथ शिंदे यांना घेणार नाही, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे.

ते पुढे म्हणाले की, विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र लढणार, जागा वाटपावरुन वाद होणार नाही याची खात्री मी देतो. महापालिका संदर्भात देखील चर्चा सुरु आहे, ज्या मोठ्या महापालिका आहेत, त्या ठिकाणी एकत्र लढण्याची इच्छा असल्याचे ते म्हणाले.