सिंह कधी गिधाडाला घाबरत नाही ; फडणवीसांनी राऊतांना धुतलं

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी इडीच्या मुद्द्यावरून आम्ही मैदानात उतरलो तर तुम्हाला नागरपुराला देखील जाता येणार नाही, असं यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हटलं होतं. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संजय राऊत हे सध्या व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. ते रोज सकाळी उठून हे लोकांचं मनोरंजन करीत आहे. त्यांच्या बोलण्याला आम्ही इतकं महत्त्व देत नाही. सिंह कधी गिधाडाला घाबरला नाही. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अशा पद्धतीने कधीही काम केले नाही. जे संजय राऊत बोलत आहेत, असंही फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, संजय राऊत हे एक संपादक आहेत आणि संपादकचं काम हेडलाईन देण्याचं असतं. संजय राऊत हे देखील दिवसभरासाठी हेडलाईन देण्याचं काम करीत आहेत. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष पुर्ण क्षमतेने काम करत आहे आणि आमच्या पद्धतीने आम्ही सरकार चालवू. काँग्रेसला आपल्याच पक्षांवर विश्वास नाही. कॉंग्रेस सध्या कमजोर परीस्थितीत आहे. पक्षामधील वरच्या लोकाचं खालच्या स्थरावरावरील नेतेमंडळी ऐकत नाही. कुणीचं कुणाच ऐकायला तयार नाहीत. ज्याठिकाणी पक्षाचं नेतृत्व भक्कम आहे. त्याठिकाणी पक्ष देखील मजबूत स्थितीत असतो.

लता दीदी खूप मोठ्या आहेत. त्यांच्या स्मारकांचा कुठल्याही प्रकारे वाद होऊ नये. त्यांच चांगलं स्मारक तयार केले पाहिजे. फक्त माझा सवाल आहे की, जर राज्य सरकार स्मारक तयार करत असेल तर कॉंग्रेस पक्ष त्यांना समर्थन देणार आहे का? शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कारावेळी मला एकही कॉंग्रेस नेता त्याठिकाणी दिसला नाही. असंही त्यांनी सांगितलं आहे.