ब्राम्हणांची पोरं खारका-बदाम खातात, बहुजनांची पोरं जांभया देतात, बाळू धानोरकरांचे जातीयवादी फुत्कार

चंद्रपूर – काँग्रेसच्या (Congress) ”आझादी का गौरव” कार्यक्रमात बोलताना खासदार बाळू धानोरकर (Mp balu Dhanorkar) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यावर टीका करताना खासदार बाळू धानोरकर यांची जीभ घसरली. ब्राह्मण समाजावर (Brahmin society) टीका करताना शिवराळ भाषा वापरल्यानेही नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

ते म्हणाले, राज्याच्या मंत्री मंडळात भ्ष्टाचारी, नालायक लोकांचा समावेश आहे. मंत्री भ्रष्टचारी असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना क्लीन चीट दिली आहे. त्यांना मानावे लागले. जन्माला यायचं असेल तर ब्राह्मणांच्याच पोटी याव. आज ब्राम्हणांची पोर खारिक बदाम खात आहेत आणि बहुजनांची मुलं जांभया देत आहेत,असे ते म्हणाले.

महाराष्ट्रातील काँग्रेसचे लोकसभेतील ( Lok Sabha) बाळू धानोरकर हे एकमेव खासदार आहेत. शिवसेनेतून काँग्रेस असा त्यांचा प्रवास आहे. या आधीही अनेकदा त्यांच्या वक्तव्यावरून वाद ओढविला आहे. अशा वक्तव्यामुळं समाजा-समाजात तेढ निर्माण होऊ शकतो. त्यामुळं अशी वादग्रस्त वक्तव्य टाळली पाहिजे, असं मत व्यक्त केलं जातंय.