मी कष्टाची भाकरी खातो,मी सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही; भुजबळ जरांगेंवर बरसले

Chagan Bhujbal speech : राष्ट्रवादीचे फायरब्रांड नेते छगन भुजबळ ( Chagan Bhujbal ) यांच्या नेतृत्वात जालन्यातल्या अंबडमध्ये शुक्रवारी ओबीसी एल्गार महासभेचं आयोजन करण्यात आलं.यावेळी भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांच्यावर टीका केली आहे.

छगन भुजबळ यांनी 2 वर्षं तुरुंगात झुणका भाकरी खाल्ली अशी टीका जरांगे पाटील यांनी केली होती.त्यावर प्रत्युत्तर देताना भुजबळ यांनी जरांगे पाटली यांना म्हटलंय, “हो मी तुरुंगात झुणका भाकरी खाल्ली, आज दिवाळीतही खातो. मी कष्टाची भाकरी खातो. मी सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही.”

जालन्यात पोलिसांवर झालेल्या हल्ल्यावरून देखील छगन भुजबळ यांनी राज्य सरकारसह मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. जरांगे पाटील यांनी उपोषण केलं. त्यावेळी पोलिसांचा लाठीमार झाला. पोलिसांचा लाठीमार सर्वांनी पाहिला. पण 70 पोलीस जखमी झाले. महिला पोलीसही जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल केले. हे सर्व पोलीस दगडांचा मार खावून जखमी झाले. जरांगेंना उठवायला पोलीस गेले होते. त्यावेळी मी झोपलोय नंतर या, असं जरांगे म्हणाले. त्यामुळे पोलीस गेले. याने गच्चीवरून सर्व तयारी केली होती. पोलीस जेव्हा त्यांचं उपोषण सोडवायला गेले. तेव्हा दगडांचा मारा सुरू झाला. पटापट पोलीस जमिनीवर पडले. 70 पोलीस काय पाय घसरून पडले का?; असा सवाल राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला.

महत्वाच्या बातम्या-