“हिंदू समाजाचा अनादर करण्याचा हेतू नव्हता”; 12वी फेल फेम Vikrant Massey ने मागितली माफी

Vikrant Massey Apologies For Old Tweet: टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटवणारा विक्रांत मेस्सी सध्या चर्चेत आहे. 2023 साली 12 वी नापास या चित्रपटाद्वारे त्याने प्रेक्षकांची खूप मने जिंकली. 20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 50 कोटींहून अधिक कमाई केली होती. या चित्रपटाद्वारे त्याने आयपीएस अधिकारी मनोज कुमार यांची संघर्षकथा चित्रपटाच्या पडद्यावर आणली. या चित्रपटाच्या यशानंतर विक्रांत मेस्सीनेही त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले.

मात्र, 12वी फेल या चित्रपटासाठी प्रेक्षकांचे प्रेम मिळालेला विक्रांत मेस्सी आता श्री राम- माता सीता यांच्यावर केलेल्या जुन्या ट्विटमुळे वादात सापडला आहे, ज्यासाठी त्याने आता माफी मागितली आहे. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

नुकतेच विक्रांत मेस्सीला सोशल मीडियावर लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. याचे कारण म्हणजे 2018 मध्ये त्याने श्री राम आणि माता सीता यांच्यावर केलेले ट्विट. विक्रांत मेस्सीची एक जुनी पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होत आहे. वास्तविक, विक्रांतने 2018 मध्ये, सीता आणि भगवान राम यांचे एका वृत्तपत्रात आलेले व्यंगचित्र शेअर केले होते. यामध्ये दिसते की, भगवान राम यांना सीता म्हणते, “मला खूप आनंद झाला आहे की माझे अपहरण रावणाने केले होते, ना की तुमच्या भक्तांनी!” या फोटोला विक्रांतनं कॅप्शन दिले होते, “Half baked potatoes and half-baked nationalists will only cause pain in the gut”. Kathua Case, Unnao, Shamem हे हॅशटॅग्स देखील विक्रांतनं या ट्विटला दिले. विक्रांतनं हे ट्विट नंतर डिलिट केलं.

त्याच्या या जुन्या ट्विटमुळे यूजर्स संतापले आहेत. हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप अभिनेत्यावर करण्यात येत आहे. आता नुकतेच विक्रांत मेस्सीने या ट्विटबद्दल माफी मागितली आहे.

विक्रांतनं एक ट्विट शेअर करुन चाहत्यांची माफी मागितली आहे. या ट्विटमध्ये त्यानं लिहिलं, “2018 मध्ये माझ्या एका ट्विटच्या संदर्भात मी काही गोष्टी सांगू इच्छितो, हिंदू समाजाला दुखावण्याचा, बदनाम करण्याचा किंवा त्यांचा अनादर करण्याचा माझा हेतू कधीच नव्हता.”

पुढे विक्रांतनं ट्विटमध्ये लिहिलं, “पण मी थट्टेने केलेल्या ट्विटबद्दल विचार केला. वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले व्यंगचित्र न शेअर करता देखील मी माझे मत मी मांडू शकलो असतो. ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांची मी अत्यंत नम्रतेने माफी मागू इच्छितो. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की, मी श्रद्धा आणि धर्माला सर्वोच्च मानतो. आपण सर्वजण काळानुसार पुढे जातो आणि आपल्या चुकांचा विचार करतो, हे माझे होते.” विक्रांतच्या या ट्विटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

महत्वाच्या बातम्या :

राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार कुणी दिला? राज ठाकरेंनी मराठा समाजाला जागृत राहण्याचा इशारा दिला

पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेले १६ टक्के आरक्षण १० टक्क्यांवर कसे आले? Devendra Fadnavis म्हणाले…

“उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या…”, मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल