५ हजारांपेक्षा जास्त महागड्या भेटवस्तू घ्याल तर खबरदार ; योगींची मंत्र्यांसाठी नवी आचारसंहिता 

 लखनौ – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ (Uttar Pradesh Chief Minister Adityanath) यांनी मंत्र्यांसाठी नियम सेट केला आहे. योगींनी मंत्र्यांना (Minister) 5000 पेक्षा जास्त महागड्या भेटवस्तू (Expensive gifts) घेऊ नका असे सांगितले आहे. याशिवाय त्यांनी आपल्या मंत्र्यांना तीन महिन्यांत संपत्ती जाहीर करण्याच्या तोंडी सूचना आणि सोबत लेखी आचारसंहिताही दिली आहे.

मुख्यमंत्री योगी यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. कोणत्याही मंत्र्याने 5,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या भेटवस्तू किंवा सन्मानचिन्ह स्वीकारू नये, असे त्यांनी म्हटले आहे. ही महागडी भेट राज्य सरकारची मालमत्ता मानली जाणार आहे. ती तिजोरीत जमा करावी लागते. जर मंत्र्याला महागडी भेटवस्तू आपल्याजवळ ठेवायची असेल, तर भेटवस्तूच्या वास्तविक मूल्यातून 5000 रुपये वजा करून उर्वरित रक्कम त्यांना तिजोरीत भरावी लागेल.

मंत्री किंवा त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्याकडून किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून ज्यांच्याशी सरकारी व्यवहार आहे अशा कोणत्याही मौल्यवान भेटवस्तू घेऊ नयेत किंवा त्यांच्या कर्तव्यावर परिणाम होईल असे कोणतेही कर्ज (Loan) घेऊ नये. परदेशात मिळालेल्या प्रतिकात्मक भेटवस्तू जसे की सन्मानपत्र, मानचिन्ह किंवा समारंभाशी संबंधित भेटवस्तू मंत्र्यांनी  घेऊ नयेत उर्वरित रक्कम कोषागारात जमा करावी लागेल.

कोणत्याही संस्थेकडून पुरस्कार घेण्यापूर्वी मंत्र्यांनी त्याबाबत सखोल चौकशी करावी. संस्था ठीक असेल तर बक्षिसे घेता येतील, पण रोख रक्कम (Cash) घेऊ नये. पुरस्कार देणारी संस्था परदेशी असल्यास शासनाची परवानगी घ्यावी लागेल. योगींनी आचारसंहितेची ही प्रत मंत्र्यांना दिली होती.लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत सर्व निवडून आलेल्या सदस्यांसाठी सार्वजनिक वर्तनाचे मानके निश्चित करण्यात आले आहेत.

याशिवाय 2009 मध्ये गृह मंत्रालयाने (Ministry of Home Affairs) सर्व राज्यांच्या मंत्र्यांसाठी आचारसंहिता जाहीर केली होती. यामध्ये मंत्र्यांचे पुरस्कार, प्रवास, मालमत्ता, कुटुंबीयांची भूमिका यासह प्रत्येक बाबीशी संबंधित लक्ष्मणरेखा यांचा उल्लेख आहे.योगी जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी सर्व मंत्र्यांना त्यांच्या संपत्तीचा तपशील देण्यास सांगितले होते. खुद्द योगींनी ते पाळले होते पण त्यांच्या सर्व मंत्र्यांना ते पाळता आले नाही. आता योगी पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत, त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा सर्व मंत्र्यांना संपत्ती आणि आचार याबाबत धडा शिकवला. एवढेच नाही तर यावेळी त्यांनी आचारसंहितेच्या प्रती (Copies of the Code of Conduct) सर्व मंत्र्यांना दिल्या.