रेखा आणि संजय दत्त यांनी गुपचूप लग्न केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरते तेव्हा…

पुणे – अभिनेत्री रेखा आता वयाची साठी पार केली आहे परंतु अजून देखील ती तितिकीच सुंदर दिसते. बॉलीवुडमध्ये काही मोजक्याच एवरग्रीन अभिनेत्री आहेत, ज्यामध्ये रेखाचे नाव सर्वात प्रथम घेतले जाते. पण रेखा जितकी तिच्या चित्रपटासाठी गाजली त्याहून अधिक ती तिच्या खाजगी आयुष्यासाठी देखील चर्चेत राहिली.

रेखाचे नाव अनेकांशी जोडले गेले पण सर्वाधिक रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरची चर्चा झाली. अमिताभ आणि रेखा यांचे अनेक किस्से देखील आज सांगितले जातात. पण अशीच एक अफवा काही वर्षांपूर्वी पसरली होती ती अफवा म्हणजे रेखा आणि संजय दत्त यांनी गुपचूप लग्न केले आहे.

1985 साली रेखा करीयरच्या एका वेगळ्या उंचीवर होती , तर संजय दत्त यांचे संपूर्ण करियर डबगाईला आले होते. 1984 साली रेखा आणि संजय यांनी जमीन आस्मा हा सिनेमा एकत्र केला होता. रेखा आणि संजय यांची यावेळी मैत्री झाली. संजय त्यावेळेस संपूर्ण व्यसनाधीन झाला होता. रेखा यांना वाटत होते की संजयने यातून बाहेर यावे. रेखाने यासाठी कित्येक प्रयत्न देखील केले पण सारे काही असफल झाले .

या सर्व काळात रेखा आणि संजय जवळ आले होते. अनेकांनी तर अशी अफवा देखील पसरविली की रेखाने आणि संजय दत्त यांनी लग्न केले आहे. परंतु रेखा यांनी कधीच या गोष्टी विषयी काहीच सांगितले नाही. पण संजय यांनी मात्र या गोष्टीला साफ नकार दिला आहे. ही बातमी संपूर्णता खोटी आहे असे संजय यांनी संगितले. रेखाने आजपर्यत शेकडो सिनेमात काम केले आहे. रेखा यांना अगदी मनापासून वाटत की संजय यांनी सर्व वाईट नाद सोडावेत पण संजय यांनी त्यांचे नाद सोडले नाहीत.