‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक

सायंकाळी ७ वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

Bhausaheb Rangari Ganapati- ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक उद्या (गुरुवार) सायंकाळी ७ वाजता निघणार आहे. त्यासाठी यंदा आकर्षक ‘मयूरपंख रथ’ तयार करण्यात आला असून आकर्षक पद्धतीने सजवलेल्या या रथामध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन (Puneet Balan) यांनी याबाबत माहिती दिली.

गणेशोत्सवाचा दहा दिवसांचा उत्सव उत्साहात पार पाडल्यानंतर उद्या विसर्जन मिरवणूक निघणार आहे. हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’च्या मिरवणुकीबाबत माहिती देताना उत्सवप्रमुख पुनीत बालन म्हणाले, ‘‘दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाची जल्लोषात आणि शानदार अशी विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. दिवसभरात मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर सायंकाळी ७ वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात होईल. या मिरवणुकीसाठी आकर्षक पद्धतीने मयूरपंख रथ सजविण्यात आला असून या रथासमोर पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशा पथके जोरदार वादन करणार आहेत. या पथकांमध्ये समर्थ पथक, रमणबाग पथक, श्रीराम पथक या तीन पथकांचा समावेश आहे. त्यासोबतच रथासमोर पारंपरिक मर्दानी खेळांचेही प्रात्यक्षिक जगभरयातील गणेश भक्तांना आणि पुणेकरांना पहायला मिळेल.’’

‘‘पुण्यातील बाप्पाची विसर्जन मिरवणूक हे सर्वच गणेश भक्तांचे प्रमुख आकर्षण असते. त्यामुळे ती मिरवणूक देखणी, आकर्षक आणि दिमाखदार कशा प्रकारे होईल, असा सर्वच गणेश मंडळांचा प्रयत्न असतो. आमचाही असाच प्रयत्न आहे. अधिकाधिक गणेश भक्तांनी या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन आनंद घ्यावा आणि बाप्पाला भक्तीभावाने निरोप द्यावा.’’
– पुनीत बालन (विश्वस्त व उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)

https://www.youtube.com/shorts/LLrVrVQpCd4

महत्त्वाच्या बातम्या-

“महिला आरक्षणावरील पंतप्रधानांचे वक्तव्य चुकीचे, कॉंग्रेसच्या काळातच महिलांना संधी दिली गेली”

सातारा जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची नियुक्ती; अजित पवार यांनी दिले नियुक्तीपत्र…

Shivsena : ठाकरेंची साथ सोडत मातब्बर नेत्यांनी केला शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश