जेवणात मासे न बनवल्याने जावयाची पत्नीला मारहाण, चिडलेल्या सासरा-मेहुण्याने केला दुर्देवी अंत

Bihar Crime News: बिहारच्या भोजपूरमध्ये पत्नीला मारहाण करणं जावईला महागात पडलं. मुलीला मारहाण केल्याने संतापलेल्या सासऱ्याने आणि भावाने रविवारी रात्री जावयाचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी सोमवारी दुपारी जावयाचा मृतदेह ताब्यात घेतला. तरुणाच्या मानेवर खोल जखमेच्या खुणा आढळून आल्या.

मृत 32 वर्षीय बसंत राम हा मूळचा चारपोखरी पोलीस स्टेशन हद्दीतील नागरी गावचा रहिवासी होता. लग्नानंतर तो उदावंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलौर गावात सासरच्या घरी राहात होता.

आरोपी सासरा आणि मेहुण्याला अटक
मयताचे काका सुदामा राम यांनी हत्येबाबत संबंधित पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरच्या आधारे तत्काळ कारवाई करत पोलिसांनी आरोपी सासरा केदार राम आणि मेहुणा फगू राम यांना अटक केली आहे. लाकडाने गळा आवळून त्याची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेचे मूळ दाम्पत्यातील भांडण आणि पतीने पत्नीला मारहाण केल्याने झालेल्या वादातून झाल्याचे सांगण्यात येत आहे.

15 वर्षांपूर्वी लग्न झाले
बसंत राम याचा विवाह बेलौर येथील केदार राम यांची मुलगी मोनाकोशी सुमारे पंधरा वर्षांपूर्वी झाला होता. लग्नाच्या दोन वर्षापासून ते संपूर्ण कुटुंबासह बेलौर येथील सासरच्या घरी राहत होते.

रविवारी रात्री काही कारणावरून पती-पत्नीमध्ये भांडण झाले. यानंतर मद्यधुंद पतीने रागाच्या भरात पत्नीला मारहाण केली. त्यामुळे ती घर सोडून माहेरी गेली. यानंतर मारहाण केल्यानंतर सासरा आणि मेहुण्याने लाकडाने गळा आवळून जावयाचा खून केल्याचा आरोप आहे. पोलिस स्टेशनचे प्रमुख अवधेश कुमार यांनी सांगितले की, घरगुती वादातून पतीने पत्नीवर हल्ला केल्याने संतापलेले सासरे आणि मेहुणे यांनी मिळून ही घटना घडवली.

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत होते
रविवारी रात्री उशिरा पोलीस ठाणे हद्दीतील बेलौर गावात पतीने पत्नीला मारहाण केल्याने संतापलेल्या मुलीच्या वडील व भावाने जावयाचा लाकडाच्या तुकड्याने गळा दाबून खून केला. सकाळी उठल्यानंतर जावयाचा मृत्यू झाल्याची माहिती गावाला मिळाली. लवकरात लवकर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने ते मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास निघाले.

पोलिस बेलौरला पोहोचेपर्यंत ते मृतदेह घेऊन निघून गेले होते. पोलिसांनी त्याला पिनियाजवळ अडवून पोलीस ठाण्यात नेले. यानंतर शवविच्छेदनासाठी आरा सदर रुग्णालयात पाठवण्यात आले.

यावरून वाद झाला
रविवारी रात्री घरी मासे शिजवून दारू प्यायल्याने वाद वाढला. पत्नी मोनाकोला मारहाण केल्याचा निषेध केल्याने हे प्रकरण आणखी चिघळले. त्यानंतर बसंत रामचा दोन काठ्यांनी गळा आवळून खून करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या-

Navratri : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा