“हिंदू हा धर्म नाही तर ही जगण्याची पद्धत”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे मोठे वक्तव्य

Milind Gawali: कलाकार आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता नेहमीच त्यांच्या चाहत्यांना असते. झी मराठीवरील आई कुठे काय करते या मालिकेतील अभिनेते मिलिंद गवळी यांनी नुकतीच लोकसत्ता ऑनलाइनला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी स्वत:बद्दल अनेक खुलासे केले आहेत, तसेच अध्यात्म, हिंदू धर्माबद्दल (Hindu Dharma) आपले मतही मांडले आहे.

नवस, उपवास आणि अध्यात्माविषयी बोलताना मिलिंद गवळी म्हणाले, “मी नवस, उपवास वगैरे करत नाही. कोणत्याही ग्रंथामध्ये उपवास करा, असं करा, तसं करा नाही सांगितलंय. पण माझा अध्यात्मावर विश्वास आहे. मी आध्यात्मिकच आहे. मी परमेश्वराला मानतो. पण परमेश्वर म्हणजे कोण? याची संकल्पना अजूनही लोकांना कळलेली नाहीये. पण मी बुद्धिस्टपण आहे, हिंदू पण आहे, मी ख्रिश्चन पण आहे. माणसाने जे जातपात, धर्म तयार केलेत. त्याच्या पलीकडे ज्यांनी माणसाला तयार केलं, सृष्टीला तयार केलं, विश्व तयार केलं, तो परमेश्वर. त्याला रंग, रुप, जातपात काहीच नाही. तुम्हाला त्याच्याकडे जाण्यासाठी लोकांनीच मार्ग काढले आहेत. मग तुम्ही मुसलमान व्हा, बुद्धिस्ट व्हा किंवा हिंदू व्हा.”

“खरंतर हिंदू हा धर्म नाही, ही जगण्याची पद्धत आहे. त्यामुळे मी नशीबाने हिंदुस्थानात जन्माला आलो, मी भारतात जन्माला आलो. म्हणून मी या संस्कृतीत वाढलो आणि मला त्याचा खूप अभिमान वाटतो, मी हिंदू म्हणून जन्माला आलो. जर कुठल्या अरब देशात जन्माला आलो असतो तर अल्लाहाच्या मार्फत तिकडे पोहोचलो असतो. तो काही पोहोचणार नाही. त्याला काही परमेश्वर कळणार नाही असं नाहीये. प्रत्येक माणसांमध्ये परमेश्वर आहे. परमेश्वराने त्याला तयार केलं आहे. त्यामुळे परमेश्वराचा अंश त्याच्यात आहे. म्हणजेच तोच पक्षी, प्राणी, सृष्टी, जीवात्मा आहे. ही पृथ्वी परमेश्वराची संकल्पना आहे. त्यामुळे मी आध्यात्मिक आहे,” असं मिलिंद गवळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

Navratri : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा