उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, निष्ठावंत सुभाष देसाई यांच्या सुपुत्राचा शिवसेनेत प्रवेश!

Mumbai – माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशकेला आहे. या प्रवेशाला खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. भूषण देसाई एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत प्रवेश केल्याने हा ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.( Bhushan Desai joins Shivsena ).

सुभाष देसाई हे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, सुभाष देसाईंचा मुलगा भूषण देसाई आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेत गेला आहे. भूषण देसाई यांच्या निर्णयामुळं शिवसेनेतल्या फुटीनंतर आणखी एका घरात फूट पडल्याचं दिसून येत आहे.