पुण्यातल्या भिडे वाड्यात राज्य सरकार मुलींची शाळा सुरू करणार

Bhide Wada – पुण्यातल्या भिडे वाड्यात राज्य सरकार सावित्रीबाई फुले यांचं राष्ट्रीय स्मारक उभारणार आहे. याठिकाणी मुलींची शाळा उभी करण्याचा सरकारचा मानस आहे. स्मारकाचं काम लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.(The state government will start a girls’ school at Bhide Wada in Pune)

पुण्यातल्या भिडे वाड्या महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. स्मारकासाठी झालेल्या भूसंपादनाविरोधात वाड्यातल्या भाडेकरूंनी २०१० मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीत वाड्याची जागा स्मारकासाठी देण्याच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयानं निकाल दिला. यामुळे स्मारकासाठीच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला असून स्मारकाच्या कामाला गती येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या-

Navratri : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा