ईडी पेक्षा शेतकऱ्यांच्या खिशातल्या बिडीला किंमत जास्त आहे; धनंजय मुडेंचा दावा 

उस्मानाबाद – गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी सुरु आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर राज्यातील राजकारण अधिकच तापले आहे. त्यातच पुढील काही दिवसांत राज्यातील महत्वाच्या महानगरपालिकामध्ये निवडणूका होणार आहेत. त्यामुळे राजकाराण आणखी तापले आहे. राज्यातील ईडीच्या कारवाईवर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुडे यांनी निशाणा साधला आहे.

भाजपच्या अंगातला माज अजूनही गेलेला नाही, होत्याच नव्हतं नव्हत्याचं केलं तरी भल्या भल्यांच्या मागे इन्कम टॅक्स काय ईडी काय सुरु आहे. ईडीची तर इज्जत ठेवली नाही ईडी पेक्षा शेतकऱ्यांच्या खिशातल्या गणेश बिडी तिची किंमत जास्त आहे असं मुंडे म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, त्यांना वाटतंय की आम्ही यांना झुकवू शकतो. भाजपची खरी जिरवायची असेल तर जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष दाखवून द्या. पुन्हा म्हणून भाजप कधीही महाराष्ट्राच्या मातीत अशा प्रकारचा नाद करणार नाही, असा विश्वास असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.