#IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका, 14 कोटींचा खेळाडू होणार स्पर्धेतून बाहेर ?

चेन्नई – इंडियन प्रीमियर लीगचा 15वा सीझन सुरू होण्यास फारसा वेळ उरलेला नाही. IPL 2022 26 मार्चपासून सुरू होणार आहे. त्याच वेळी, 14 किंवा 15 मार्चपासून सर्व संघ आपला सराव सुरू करतील. याआधी चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे.

वास्तविक, उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला गोलंदाज अष्टपैलू दीपक चहर आयपीएल 2022 च्या पहिल्या काही सामन्यांमध्ये भाग घेऊ शकणार नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याला दुखापत झाली होती. दीपक चहरला IPL 2022 च्या मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्जने 14 कोटी रुपयांना विकत घेतले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपक चहर आयपीएल 2022 च्या शेवटच्या काही सामन्यांमध्ये भाग घेणार आहे ते सुद्धा जर तो पूर्णपणे फिट झाला तर. त्याचवेळी, काही रिपोर्ट्सनुसार, तो आयपीएल 2022 मध्ये कदाचित तो खेळताना दिसू शकणार नाही असं देखील सांगितले जाते आहे.