हद्द झाली : गुंगीचे औषध पाजून अनैसर्गिक अत्याचार, राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhaji Nagar crime News : छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) माजी पदाधिकाऱ्याने एका महिलेला गुंगीचे औषध पाजून अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुझ्या मुलांचे अपहरण करून पतीला मारहाण करून तुझा संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देत आरोपीने 33 वर्षीय विवाहितेला पाण्यात गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटले आहे. संतापजनक म्हणजे अत्याचार करतानाचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, मुख्तारच्या धमक्यांना न घाबरता महिलेच्या नातवाईकांनी तिला घेऊन शनिवारी रात्री सिटी चौक पोलिस ठाणे गाठलं. तसेच महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. मुख्तार खान उर्फ बब्बु (वय 42 वर्ष, रा. नूर कॉलनी, टाऊन हॉल परिसर) असे आरोपीचे नाव असून, तो राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी मुख्तार ऊर्फ बब्बू याच्याविरोधात 7 मे रोजी रात्री साडेबारा वाजता गुन्हा दाखल झाला. याची कुणकुण लागताच मुख्तार फरार झाला आहे.