Bihar Govt : बिहार सरकारची हिंदूविरोधी मानसिकता आली समोर; शाळेला सुट्या देण्यावरून वाद 

Bihar Govt anti hindu order of holidays in schools –  शाळांमधील सुट्टीच्या नव्या पद्धतीला नितीश सरकारचा तुघलकी आदेश असल्याचे भाजपने म्हटले आहे. हा निर्णय म्हणजे सनातन धर्माच्या अनुयायांना धक्का असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. सरकारच्या या हिंदुविरोधी मानसिकतेचा निषेध करण्यासाठी बिहारमधील जनताही रस्त्यावर उतरू शकते. मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे हे सुनियोजित षडयंत्र आहे, ते अजिबात मान्य केले जाणार नाही. सरकारला हा आदेश मागे घ्यावा लागेल, अन्यथा जनता रस्त्यावर उतरेल असा इशारा भाजपने दिला आहे.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी म्हणाले की, रामनवमी-जन्माष्टमी असो की रक्षाबंधन, हिंदू सणांशी संबंधित सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. दिवाळी, छठ, दुर्गापूजेच्या सुट्याही मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. तुष्टीकरणाचा एक भाग म्हणून सरकारने असा निर्णय घेतला आहे. मुस्लिम समाजाच्या सणांच्या सुट्ट्या वाढवण्यात आल्या आहेत. उर्दू शाळांबाबत ते म्हणाले की, हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. संपूर्ण राज्यात एकच सुट्टी असते, मग तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या सुट्या कशा असतील. हा तुघलकी आदेश आहे, तो कधीही मान्य होणार नाही.

माजी उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद म्हणाले की, महाआघाडी सरकारने हिंदूंच्या सुट्या (विशेषतः शिवरात्री, रामनवमी, जन्माष्टमी आणि गुरु नानक जयंती) रद्द करून पुन्हा सनातनविरोधी मानसिकता दाखवली आहे. हे सरकार मतांच्या राजकारणासाठी सतत सनातन धर्माचा अपमान करत आहे, जे यापुढे सनातन धर्मीय खपवून घेणार नाहीत. सरकारने शिक्षण विभागाचा हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा भाजप अशा तुष्टीकरणाच्या आंदोलनाला विरोध करेल.

महत्वाच्या बातम्या-

राज्यातल्या दूषित वातावरणाला खोके सरकार जबाबदार, खोके सरकारने महाराष्ट्राचे राजकारण दूषित केले – सुळे

कर्णधार सापडला पण हार्दिकसारखा अष्टपैलू कसा सापडणार? या 5 खेळाडूंवर गुजरातची नजर असेल

आम्ही जुमलेबाज, भ्रष्ट पक्षांसारखे नाही; सुप्रिया सुळे यांचा दावा