भाजपाने प्रताप सरनाईकांना ब्लॅकमेल केले; सुप्रिया सुळे यांचा आरोप

मुंबई :  आमदार प्रताप सरनाईक(Pratap Sarnaik) यांच्या मागे लागलेली ईडीची पिडा कमी होणार असल्याची चर्चा आहे. ईडीकडून केस मागे घेण्याची तयारी सुरू असून क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.

भाजपाने प्रताप सरनाईकांना ब्लॅकमेल केले असा गंभीर आरोप सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी केला आहे.भाजपाने ब्लॅकमेल केल्यामुळेच सरनाईक शिंदें गटात सामील झाले. जर त्यांच्यावर झालेले आरोप खोटे असतील तर भाजपाने सरनाईक आणि महाराष्ट्राची हात जोडून माफी मागावी असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

भाजपाने देशासमोर राज्याची प्रतिमा खराब केली आहे. ज्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे खोटे आरोप झाले नंतर ते सरकारमध्ये सामील झाले. यानंतर त्यांना क्लिनचीट देण्यात आली. त्यांच्यावर खोटे आरोप झाले की, ब्लॅकमेल करण्यात आले, याला राजकारण म्हणत नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी भाजपवर घणाघात केला आहे.