केंद्रातील भाजप सरकारने ५० टक्क्यांची मर्यादा हटवून मराठा समाजाला आरक्षण द्यावे: नसीम खान

Naseem Khan: केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा, धनगर आणि मुस्लीम समाजाची फसवणूक केली आहे. काँग्रेस सरकारने दिलेले मराठा आणि मुस्लीम आरक्षण घालवून या समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे पाप भाजप सरकारने केले आहे. केंद्रातील भाजप सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनात ५० टक्क्यांची मर्यादा हटवून मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान यांनी केली आहे.

आज सकल मराठा समाजाच्या वतीने चांदिवलीच्या साकीनाका येथील ९० फुट रोडवर मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता मोठे आंदोलन करण्यात आले होते. नसीम खान यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनाला समर्थन दिले. यावेळी पत्रकारांशी बोलताना नसीम खान म्हणाले की, सन २०१४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकार असताना मराठा आणि मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०१४ रोजी सत्तेत आलेल्या भाजपा सरकारकने जाणिवपूर्वक आरक्षण घालवले. त्यानंतर सरकारने विधानसभेत मराठा आरक्षण कायदा करण्याचा प्रस्ताव आणला त्यावेळी सर्व पक्षांनी एकमताने समर्थनही दिले होते. परंतु वारंवार मागणी करूनही केंद्र सरकारने ५० टक्क्यांची मर्यादा हटवली नाही त्यामुळे आरक्षण टिकले नाही. भाजपा सरकारला मराठा-मुस्लिम समाजासहीत इतर कोणत्याही समाजाला आरक्षण देण्याची इच्छा नाही फक्त खोटे आश्वासन देण्याचे काम भाजपा सरकार करत असून त्यांचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे.

या आंदोलनात मुंबई मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रशांत परब, गणेश चव्हाण, व्यासदेव पवार, सुहास राणे, जगन्नाथ उदूगुडे, नाना भितांडे, कृष्णा नलावडे, बाबू गटे, प्रकाश शिंदे, प्रभाकर जावकर, भाऊ शेट्टी, अवधूत शेलार, नितीन पवार, दिनेश मधूकुंटा, वजीर मुल्ला, सुभाष गायकवाड, घनश्याम गायकवाड, यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या-
Jalana Lathi Charge : देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा केला म्हणून तर माफी मागितली :– नाना पटोले
‘तीन अडकून सीताराम’चा अनलिमिटेड धिंगाणा; चित्रपटाची उत्कंठा वाढवणारा टिझर प्रदर्शित
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार – Eknath Shinde